Purvi Bhave controversy:अभिनेत्री, नृत्यांगना, कवयित्री पूर्वी भावे सध्या चर्चेत आहे. तिच्या एका कवितेचा अभ्यासक्रामात समावेश करण्यात आलाय. गेल्या काही वर्षांपासून तिची ही कविता अभ्यासक्रामत आहे, मात्र आता यावर वाद निर्माण झालाय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉममुंबई: पूर्वी भावे हे नाव सध्या चर्चेत आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सिनेइंडस्ट्रीतलं हे नाव सोशल मीडियावर गाजतंय ते एका वेगळ्याच कारणामुळं. झालं असं की, पूर्वी भावे हिनं लिहिलेल्या एका कवितेचा बालभारतीच्या मराठी माध्यमाच्या पुस्तकात समावेश करण्यात आलाय. तिची ‘जंगलात ठरली मैफल’ ही कविता विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात आहे. काही दिवसांपासून कवितेचे फोटो व्हायरल झाले. या कवितेमध्ये हिंदी तसंच इंग्रजी शब्दांचा वापर, यमक जुळवण्याचा प्रयत्न करण्यात आल्यावरून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर पूर्वी भावे आहे तरी को